नवरात्री निमित्त उजळून निघाले कोल्हापुरच्या अंबाबाई मातेचे मंदिर

कोल्हापूर: आज अश्र्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहीला दिवस आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) ची अलंकार पूजा श्री आदि शंकराचार्य देवीच्या श्री महात्रिपुरसुंदरी रूपासमोर त्रिपुरासुंदरी अष्टकाची रचना करून स्तुती करताना साकारली आहे. भंडासूर दैत्याचा वध करण्यासाठी महात्रिपुरसुंदरी हा आदिशक्तीचा अवतार झाला.

हातात पाच फुलांचे बाण पाश अंकुश उसाचे धनुष्य धारण करणाऱ्या या देवीला ललिता परमेश्वरी म्हणूनही ओळखले जाते. तिच्या या सुंदर रूपाची स्तुती करण्यासाठी भगवान आदिशंकराचार्यांनी त्रिपुरासुंदरी अष्टक हे अतिशय सुंदर स्तोत्र रचले आहे आज ची पूजा तीच स्मृती जागवत आहे. आधीच जगन्मातेच भुक्ती (आयुष्यातली सर्व सुखं) आणि मुक्ती देणारे हे रूप त्यात तिला तोषवणारी ही आचार्यांची विद्वत्पूर्ण तरीही भावमधूर अशी ही रचना कंठस्थ केली तर खरोखरच तीची कृपा झाल्या वाचून रहाणार नाही.

नवरात्री निमित्त कोल्हापुर अंबाबाई मातेच्या मंदिराला विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)