शबरीमला मंदिर दर्शनासाठी खुले झाले परंतु….

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिर शनिवारी सायंकाळी दर्शनासाठी खुले झाले. पूजात सहभागी होण्यासाठी आंध्र प्रदेशहून आलेल्या 10 महिलांना पोलिसांनी पंबा येथूनच परतवले. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांचे वय 10 वर्षे ते 50 वर्षांदरम्यान होते. परंपरेनुसार 10 ते 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाही. महिलांना मंदिरात प्रवेशाला परवानगी देणाऱ्या 28 सप्टेंबर 2018 च्या त्यांच्या आदेशावर स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तरीही महिलांना जाण्यापासून रोखले जात आहे.

शबरीमला मंदिराचा दोन महिने चालणारा सोहळा भाविकांसाठी अधिकृतरित्या रविवारी पहाटे पाच वाजता सुरु होणार आहे. शनिवारी सायंकाळी हे मंदिर पुजाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींसाठी सुरु करण्यात आले. ज्या महिलांना रोखण्यात त्यातील तीन महिला आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथून आल्या होत्या. या महिलांना पंबा बेस कॅम्पमध्ये ओळखपत्र दाखवून रोखण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन महिलांचे वय हे 10-50 वर्षांदरम्यान होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या समूहातून वेगळे करण्यात आले. या तीन महिलांना मंदिराच्या परंपरेविषयी सांगण्यात आले. त्यांनतर त्या महिला परत जाण्यास तयार झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.