पुणे शहरातील तापमान घटले; उकाडा मात्र कायम

पुणे – मागील आठवडाभरात तापलेल्या पुणेकरांना मंगळवार थोडा सुसह्य गेला असून गेल्या 48 तासांत शहरातील कमाल तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारी (दि.30) शहरातील कमाल तापमान 37.7 तर लोहगाव परिसरात 41.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. तर, दुसऱ्या बाजूला उकाडा कमी झाला नाही.

एप्रिलमध्ये उन्हाचा चटका सहन होत नसल्यामुळे दुपारच्यावेळी पुणेकर घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. पुणे शहरासह अहमदनगर, जळगाव, मालेगाव, सोलापूर याठिकाणी उष्णतेची लाट आली होती. परंतू, आता ही लाट ओसरली असून, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात घट होईल, अशी शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुण्यातील कमाल तापमान 39 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल. तर दि. 3 मे रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील. दुपारी तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.