नवी दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या तब्लिघि जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणामधील १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तेथील कोरोना बाधितांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. तर बऱ्या झालेल्या बाधितांची संख्या १४ असून सक्रिय बाधितांची संख्या ७७ आहे.
निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी रात्री सरकारने जाहीर केले. तसेच दिल्लीत १३ ते १५ मार्च दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला राज्यातून सुमारे एक हजार जण उपस्थित राहिले असावेत असा सरकारी अधिकाऱ्यांचे अनुमान आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम जिल्हाप्रशासन आणि पोलीसांना देण्यात आले आहेत. बाधितांच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. .