संघाला आता धोनीशिवाय खेळण्याची गरज – गंभीर

नवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने मोठा खुलासा केला. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे २०१५ सालचा विश्वचषक खेळणार नसल्याचा निर्णय धोनीने २०१२ सालीच घेतला होता, असे गंभीर यांनी सांगितले.

गौतम गंभीर म्हणाले कि, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे २०१५ सालचा विश्वचषक खेळणार नाही कारण त्यांची फिल्डिंग चांगली नसल्याने धोनीने हा निर्णय घेतला होता. याशिवाय तत्कालीन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सेहवाग, सचिन आणि गंभीर यांना एकत्र खेळण्याची संधी देणार नसल्याचा धोनीने सांगितले होते. धोनीच्या या विधानाने मला धक्का बसला होता. कोणत्याही क्रिकेटरसाठी हे धक्कादायकच असेल. २०१२ सालीच आगामी विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा मी कधीही ऐकले नव्हते. जर तुम्ही धावा बनवत असाल तर तुमच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे, असे मला वाटते.

धोनी कर्णधार असताना भविष्याकडे पाहून निर्णय घेत होता. धोनीने कर्णधार असतानाही भविष्यातील खेळाडूंवर केंद्रित राहायचा. धोनी भावनिक नव्हेतर व्यावहारिक निर्णय घेत होता. धोनीच्या पुढे पाहण्याची आता वेळ आली आहे. आता रिषभ पंत, संजू सैमसन आणि इशान किशन सारख्या खेळाडूंवर लक्ष्य केंद्रित करण्याची वेळ आली आहे. त्यांना एक ते दीड वर्षाचा वेळ द्यायला हवा. जर त्यांनी चांगले प्रदर्शन केले नाहीतर दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असेही गंभीरने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.