सोलापूर – सध्या राज्यात कोरोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामाकरीता शाळेतील शिक्षक कार्यरत आहे. या कामामध्ये रोटेशन पद्धतीने महिनाभर प्रत्येक शिक्षकाची ड्युटी मुख्यध्यापकांना लावायची असते. मात्र काही ठिकाणी कोरोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामासाठी काही शिक्षकांकडून नकार देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी या कामावरून चक्क मुख्याध्यापकांना मारहाण केल्याची घटना समोर येत आहे.
अशीच एक घटना सोलापूरतील सोशल प्राथमिक शाळेत घडली आहे. या शाळेतील ऐकून २७ शिक्षक कोरोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामासाठी कार्यरत आहेत. मात्र करोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षक पत्नीला ड्युटी लावल्याच्या संतापातून पतीने थेट शाळेच्या मुख्याध्यापकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांनी कोरोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामासाठी शाळेतील शिक्षकांची रोटेशन पद्धतीने महिनाभर प्रत्येकाची ड्युटी लावली. परंतु शिक्षक पत्नीला कोरोनाची ड्युटी लावल्याच्या संतापातून या शिक्षिकेचा पती सद्दाम जाकीर नाईकवाडी यांनी थेट मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण केली. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पूर्वीही, शाळेत हजेरी का घेतली नाही? या क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापिकेच्या पतीने शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मुख्याध्यापिकेचे पती केशव भांगे हे याच शाळेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी शहरात ही धक्कादायक घटना घडली होती.