मंदिराला देणगी दिली नाही म्हणून नोकरीवरून काढले; संघाच्या शाळेतील शिक्षकाची तक्रार

बलिया – अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी देणगी दिली नाही म्हणून आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेतील एका शिक्षकाने केली आहे. यशवंत प्रतापसिंह असे या शिक्षकाचे नाव आहे. ते संघाच्या जगदीशपुर भागातील सरस्वती शिशु मंदिर या शाळेत आचार्य (शिक्षक) म्हणून नोकरीत होते.

या शाळेने याच कारणासाठी आपला पगारहीं अडवून ठेवला आहे अशी तक्रार त्यांनी केली आहे. आपल्याला मंदिरासाठी निधी जमवण्यासाठी शाळेने एक पावती पुस्तक दिले होते. त्यानुसार आपण 80 हजाराचा निधी जमवून शाळेत जमा केला. तथापि आपण व्यक्तीगत स्वरूपात राम मंदिरासाठी देणगी दिली नव्हती.

संघाचे जिल्हा प्रचारक सत्येंद्र हे जेव्हा शाळेत आले त्यावेळी त्यांनी मला व्यक्तीगत स्वरूपात एक हजार रूपयांची देणगी देण्याचा आग्रह केला. पण मी त्याला नकार दिल्यानंतर मला गैरवागणूक देऊन शाळेतून काढून टाकण्यात आले असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कोर्टात जाऊन दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान संबंधीत संस्थेंने त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक धीरेंद्र यांनी म्हटले आहे की निधी संकलनासाठी यशवंत प्रतापसिंह यांनी स्वत:हून तीन पावती पुस्तके घेतली पण संकलीत निधी त्यांनी जमा केला नाहीं. त्यांनी नंतर स्वत:हून राजीनामा दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.