शिक्षकमंत्री शाळेत जाणार 

नवी दिल्ली – भारतीय शिक्षण पद्धतीत सतत होणारे बदल हे शिक्षण क्षेत्रात मोठी शैक्षणिक क्रांती घडवत आहे. तर दुसरीकडे कोणतेही शिक्षण प्राप्त करण्यासाठी वयाचे किंवा इतर कसलेही सामाजिक बंधन नसते. याचेच उदाहरण झारखंडमध्ये दिसून आले आहे. मंत्रालयाच्या जबाबदारी सोबतच झारखंडचे शिक्षण मंत्री जगरनाथ महतो शाळेतील बाकावर बसून शिक्षण घेतांना दिसून येणार आहे.

झारखंडच्या राजकारणातील सुबेचे शिक्षण मंत्री  जगरनाथ महतो 10वी पास आहेत. परंतु, आता ते इंटरचे शिक्षण घेणार आहे.

याविषयी मंत्री जगरनाथ महतो म्हणाले,’ शिक्षण मंत्री पदाची शपथविधी वेळी काही लोकांनी माझी खिल्ली उडवली होती. याचेच प्रत्युत्तर देण्यासाठी मी शिक्षण घेणार आहे. याच बरोबरीने मी मंत्रालय सुद्धा सांभाळणार आहे.’

दरम्यान, डुमरी विधानसभा क्षेत्रातील  नवाडीह परिसरातील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयात त्यांनी सोमवारी इंटरमीडिएट प्रवेश घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.