मांजरी – करोना काळात आरोग्य यंत्रणेसह इतर घटकांचेही मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही उल्लेख करावा लागेल. ते ही कोरोना योद्धाच आहेत, असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोगावले यांनी केले.
महादेव नगर येथील इंदिरा शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वधारण बैठक नुकतीच झाली. यावेळी गोगावले बोलत होते. ते म्हणाले की, कोरोना काळात शैक्षणिक संस्थांनाही आर्थिक फटका बसला आहे. बालवाडी ते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागले. ही प्रकिया राबविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान लाभले म्हणूनच ते कोरा योद्धाच आहेत.
यावेळी करोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल संस्थेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक रविंद्र (भाऊ) गोगावले, बाळासाहेब विभुते, काळूराम हिंगणे, निलेश कुदळे यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.