करचुकवेगिरीचे रॅकेट दिल्ली पोलिसांकडून उघड

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी आज करचुकवेगिरीचे एक रॅकेट उघड केले आणि 5 जणांना अटक केली. या गॅंगमधील सदस्य दिल्ली आणि परिसरामधील रहिवासी आहेत. अंकुश अग्रवाल (44), सुभाष चंद (42), अजय कुमार (35), हरिष (24) आणि कमाल (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण बनावट “जीएसटी’ परतावे दाखल करत असत आणि लाखो रुपयांचा अपहार करत असत, असे पोलिसांनी सांगितले. या सर्वांना सेंट्रल डिस्ट्रीक्‍टमधील जामा मशिद पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्या सर्वांविरोधात फसवणूकविरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.