बुधवारी पहाटे घडली घटना
कराड – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोयना नदीवरील जुना तांबवे पुल आज (बुधवारी) पहाटे ५ ते ६ या दरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जिवित्त हानी झाली नाही.
कोयना नदीला आलेल्या महापुरामुळे बरेच दिवस तांबवेपूल पाण्याखाली होता.
तर तांबवे गावात पुराचे पाणी घुसल्याने येथील ग्रामस्थाना आपली घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले होते. खबरदारीचा उपाय म्हणून मागील एक महिन्या पासून पोलीस प्रशासनाने तांबवेचा जुना पूल बंद केला होता. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला आहे.