आपले हल्ले सुरूच ठेवणार : तालिबान

काबूल : अमेरिकेने मोठा गाजावाजा करत तालिबानशी केलेला शांतता करार तालिबान 48 तासांच्या आत मोडण्याची घोषणा केली. आपले अफगाण लष्करावरील हल्ले सुरूच राहतील, असे तालिबानने म्हटले आहे.

हिंसाचारात झालेली घट आता संपली आहे आणि आमच्या कारवाया नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहीद यांनी म्हटले आहे. आमच्या (अमेरिका -तालिबान) करारानुसार आमचे मुजाहिद्दिन परदेशी फौजांवर हल्ले करणार नाहीत. मात्र काबूल प्रशासनावरील आमचे हल्ले सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तालिबानने दोहा कराराचे पालन केल्यास येत्या 14 महिन्यात अमेरिका आपले सैन्य अफगाणीस्तानमधून पूर्णत: मागे घेईल अशी घोषणा अमेरिका आणि तालिबानने संयुक्त निवेदनाद्वारे शनिवारी केली. सुरवातीच्या 135 दिवसांत 8600 जवान मायदेशी नेण्यात येतील. उर्वरीत सैन्य अफगाणीस्तानातून 14 महिन्यात मागे घेण्यात येईल. सर्व ताळांवरील सर्व सैन्य मागे घेण्यात येईल, असे या करारत स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.