काबूल – अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील इसिसचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा तालिबानी प्रशासनाने केला आहे. बाल्ख प्रांताची राजधानी मझार ए शरीफ शहरातील हे अड्डे तालिबानी सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले, असल्याचे तालिबानी प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीन याने म्हटले आहे.
शनिवारी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये मुजाहिदीनने या विशेष मोहिमेची माहिती दिली आहे. ही मोहिम शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होती. या विशेष मोहिमेत इसिसचे काही दहशतवादी मारले गेले आणि तालिबानचा एक सुरक्षा रक्षक जखमी झाला, असेही मुजाहिदीनने म्हटले आहे.
मझार ए शरीफमध्ये तालिबानी सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचे स्थानिक वृत्तसंस्थेनेही म्हटले आहे. या मोहिमेदरम्यान इसिसचे 5 दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी ताजिकीस्तानी आणि उझबेकिस्तानचे होते, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
Ecuador earthquake : इक्वेडोरलाही भूकंपाचा धक्का; 16 जणांचा मृत्यू…
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इसिसचे 3 अड्डे उद्ध्वस्त केले गेले. मझार ए शरीफमधील 5, 8 आणि 10 व्या जिल्ह्यातील पोलिसांनी ही कारवाई केल्याचे बाल्ख प्रांताचे पोलिसांचे प्रवक्ते मुहम्मद आसिफ वझीर यांनी म्हटले आहे.