मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा चर्चेत असतात. कधी त्या विरोधकांवर केलेल्या टोमणे मारणाऱ्या राजकीय वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते, तर कधी त्यांच्या म्युझिक अल्बममुळे किंवा सामाजिक कार्यामुळे अमृता फडणवीस लोकांच्या नजरेत येतात.
View this post on Instagram
अमृता फडणवीस यावेळी त्यांचा नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. ‘ओम जय लक्ष्मी माता’ हे गाणे अमृता यांनी गायले आहे. हे गाणे अमृता यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे.
हे गाणे शेअर केल्यानंतर खूप पसंत केले जात आहे . हे गाणे अमृता यांच्या मागील सर्व गाण्यांपेक्षा वेगळे आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. त्याचेच निमित्त साधून अमृता फडणवीस यांचे खास गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यापूर्वी ‘लव्ह यू डेमोक्रेसी’ या आगामी चित्रपटासाठी अमृता यांनी गायक शानसोबत एक गाणे गायले आहे