एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

पुणे – गैरवर्तन आणि बेशिस्तीवरून यापूर्वी निलंबित केलेल्या तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा महत्तवपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यांना समज देण्यात आली असून त्यांच्याकडून लेखी पत्र घेण्यात आले आहे. मात्र, यापुढील कालावधीत त्यांच्याकडून काही चुका झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही महामंडळाने दिला आहे.

एसटी महामंडळात वाहक, चालक अथवा अन्य पदांची भरती करताना कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना महामंडळाचे नियम बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, हे वास्तव असतानाही बहुतांशी कर्मचारी हे परस्पर गैरहजर राहणे, चालकांकडून सातत्याने अपघात होणे आणि अन्य बेशिस्त वर्तन करणे, अशा प्रकारात वाढ होत आहे. अशा चुका झाल्यास महामंडळाच्या वतीने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येते. राज्यभरात अशा प्रकारे आतापर्यंत तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांशी खटले हे न्यायालयात प्रलंबित आहेत.

या खटल्यांना वकील देणे, मनुष्यबळ पुरविणे यामुळे महामंडळाच्या प्रशासनालाही त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना काम नसल्याने त्यांची आणि कुटुंबीयांचाही पोटापाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार प्रशासकीय आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना नियुक्‍तीपत्रे देण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक माधव काळे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)