कराडमधील जे. बाबा टोळीला ‘मोक्का’

पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयितांचा समावेश

कराड – कराड शहरात टोळीयुद्धातून झालेल्या पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयित जुनेद शेख उर्फ जे. बाबा आणि त्याच्या टोळीतील तब्बल 21 जणांवर “मोक्‍का’ अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कराडमधील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस माहनिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास वारके यांनी मान्यता दिल्याने या गुन्हेगारी टोळीवरील “मोक्‍का’ कारवाईवर शिक्‍कामोर्तब झाल्याची माहिती कराडचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिली. या प्रकरणी जे. बाबा टोळीचा प्रमुख जुनेद फारुख शेख (वय 30, रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर इस्माईल मुजावर (30, सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर), शिवराज सुरेश इंगवले (24, लाहोटीनगर, मलकापूर), अल्ताफ राजेखान पठाण (50), निहाल अल्ताफ पठाण (24, दोघे रा. मंगळवार पेठ, कराड), मजहर बद्रुद्दीन पीरजादे (28, अहिल्यानगर, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (26, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड ), पितांबर ऊर्फ पप्पू विश्‍वास काटे (26, बैलबाजार रोड, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (29, रा. विंग, ता. कराड), प्रमोद ऊर्फ आप्पा तुकाराम जाधव (37, रा. साईनगर, कराड ), नीरज आनंदराव पाणके (26, कोयना वसाहत, कराड), अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (25, रा. बागल वस्ती, आगाशिवनगर), दिवाकर ऊर्फ गोंद्या बाबुराव गाडे (27, रा. साईनगर, मलकापूर), विजय बिरू पुजारी (20, रा. बैलबाजार रोड, मलकापूर), सोहेल राजूभाई मुलाणी (28, ज्ञानदीप कॉलनी, मलकापूर), अकीब लियाकत पठाण, अक्षय साहेबराव धुमाळ (दोघे रा. मलकापूर), सॅम ऊर्फ समीर नूरमहम्मद मोमीन (रा. मुजावर कॉलनी, कराड), अल्फाद कासीम शेख, आयुब बेली (रा. मलकापूर) व बालसुधारगृहात रवानगी केलेल्या मुलावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.