रिपब्लिकन सेनेचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

मेणवली – देशाच्या स्वातंत्र्यापासून, सत्तेपासून वंचित असणाऱ्या घटकांना सत्तेत आणण्याची हिच वेळ आहे. यासाठी आपापसातील मतभेद विसरून ऐकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा लोकसभा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना व पक्ष कार्यकर्त्यांनी प्रस्थापितांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश कांबळे यांनी केले.

सातारा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव आयवळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाई येथील रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी जगदीश कांबळे बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल सपकाळ, तालुका अध्यक्ष अमर बनसोडे, सचिव भाऊसाहेब सपकाळ, महाबळेश्‍वर तालुका अध्यक्ष श्रीकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुका अध्यक्ष अमर बनसोडे पाटील यांनी प्रस्थापित पुढाऱ्यांनी आजपर्यंत दलित व इतर वंचित समाजाचा निवडणुकीपुरता वापर करून काबीज केलेल्या सत्ता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याने 70 वर्षे लोटली तरी वंचित समाज सत्ता व विकासापासून लांब राहिला हे चित्र बदलण्यासाठी सर्व वंचित मागासलेल्या समाजबांधवांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचा प्रहार येथील मस्तवाल सत्ताधाऱ्यावर सर्व प्रथम वाई तालुक्‍यातून केला जाईल असे सांगत वंचित बहुजन आघाडीला रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा दिला.

वाई तालुक्‍यातील वाड्या वस्तीवरील वंचित समाजबांधव एकत्रित करून वंचित आघाडी उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याची शपथ व निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संघटक विजय सावंत, राजू काकडे, अजय कांबळे, सुरेश बोतालजी, विलास डांगे व वंचित घटकातील सर्व समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)