शिवाजीनगर तलावातून उन्हाळी आवर्तन सुरु

आवर्तन तीन आठवडे चालणार ; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

कडेगाव  –
शिवाजीनगर कॅनॉलच्या पाईपचे सपोर्ट माची जिर्ण होवून पडल्यामुळे ठिकठिकाणी कॅनॉलला गळती लागली होती. यामुळे शेतीसाठी पाणी बंद होते. ऊस शेती व इतर पिके वाळून जाण्याच्या मार्गावर होती. यामुळे नोव्हेंबर पासून आर्वतन बंद होते. अखेर कॅनॉलची दुरुस्ती झाल्यामुळे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे व कालवा निरीक्षक राठोड यांच्या आदेशानुसार व शेतकरी यांच्या मागणीनुसार कॅनॉलला पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

टेंभू योजनेच्या मुख्य कॅनॉलचे सिमेंटच्या अस्तरीकरणाचे काम सुरु असल्याने शिवाजीनगर ओढ्याचे पाणी आटले होते. यामुळे कडेगाव, निमसोड, सोहोली, कडेपूर, चिखली गावातील शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडल्या होत्या. पिके दुपार धरत होती. मात्र पाणी सोडल्याने ओढ्याला व कॅनॉलला टेंभू योजनेचे रिझर्व टॅंक शिवाजीनगर तलावातील पाणी सोडल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. हे आर्वतन तीन आठवडे चालणार आहे. मात्र तलावातच पाणी कमी असल्याने अस्तरीकरणाचे काम बंद करुन टेंभू योजना पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शिवाजीनगर कॅनॉलमुळे कडेगाव शहर व शिवाजीनगर गावातील शेकडो एकर जमीनीवर ऊस व बागायती शेती केली जाते. मात्र चार वर्षापुर्वीच संपुर्ण कॅनॉलचे अस्तरीकरणाचे काम झाले आहे. या कामाचा ठेका एका मोठ्या कंपनीस मिळाला होता. मात्र कंपनीकडून हा ठेका सब ठेकेदार म्हणून दुसऱ्याने घेवून कामाची वाट लावली आहे. कडेगाव व शिवाजीनगर गावातील निम्म्या जमिनीस पाणी पुरवठा करणाऱ्या कॅनॉलचे निकृष्ठ काम करुन विद्रुपीकरण केले.

काही ठिकाणी अस्तरीकरणाचे अगोदर कालव्यास गळती नव्हती. मात्र अस्तरीकरणामुळे गळती लागली. अस्तरीकरण सुरु असताना पाण्याच्या उपलब्धतेसाठी कालव्यात माती टाकून पाणी अडविले आणि माती तशीच ठेवली. मातीचा आता गाळ झाला आहे. अस्तरीकरणाचे सिमेंटचा स्तर त्यावर मातीचा गाळ यामुळे कालव्यात पाणकणसे उगवली आहेत.शेतकरी यांनी पदरमोड करुन केलेले चार वर्षाचे पैसे शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत.

एकंदरीतच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शिवाजीनगर तलाव्याच्या कालव्यातून ओढा व कॅनॉलला टेंभू योजनेचे उप कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे व कालवा निरीक्षण राठोड यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने कडेगाव, शिवाजीनगर, निमसोड, चिखली तटातील चिखली, कडेपूर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला आता मुबलक पाणी मिळाले आहे.

ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत.शिवाजीनगर तलावाचे पाणी कडेगावातील शेतीला कालव्यातून न देता बंदिस्त पाईपमधून कडेगावातील सांजीरा शिवारातील ओघळीस सोडावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार आहे.

डी. एस. देशमुख
सामाजिक कार्यकर्ते

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)