कतरिना आणि विकी कौशलचा साखरपुडा?

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यातील विशेष नातेसंबंधाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या नात्यावर आता शिक्कामोर्तब करण्याची वेळ आली आहे. या दोघांचा साखरपुडा झाल्याची एक बातमी नुकतीच समोर आली आहे.
या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले होते. ही बातमी किती खरी आहे हे मात्र लगेच समजू शकलेले नव्हते. विकी कौशलच्या वडिलांनी यावर प्रकाश टाकला आहे.
ही बातमी म्हणजे केवळ एक अफवा आहे, असे विकीचे वडील शाम कौशल यांनी स्पष्ट केले आहे.
कतरिनाच्या जवळच्या मित्रमंडळींनीही ही अफवा असल्याचे सांगितले आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या पापाराझींनी इन्स्टाग्रामवरची आपली पोस्ट डिलीट केली आणि ही अफवा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत हे दोघांच्याही जवळच्या मित्रांनी स्पष्ट केले आहे.
पण या दोघांनी स्वतः मात्र याबाबत कोणतेही भाष्य कधीच केलेले नाही. कतरिना सध्या सलमान खानच्या “टायगर 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच सिनेमाच्या शूटिंगला ती आजच रशियाला रवाना झाली आहे, तर विकी कौशल सध्या “इमॉर्टल अश्वत्थामा’ची तयारी करतो आहे.





