शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या 14 विद्यार्थ्यांचे यश

दोन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले

सातारा- न्यू इंग्लिश स्कूलमधील 14 मुला मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. यापैकी दोन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

यामध्ये इ. 5 तील महेंद्र गणेश देशपांडे हा 278 गुण मिळवून राज्यात 12 वा आणि जिल्ह्यात 11 वा आला तर याच परीक्षेत हृदयेश योगेश शेठे यांनी 276 गुण मिळवून राज्यात 15 वा जिल्ह्यात 12 वा क्रमांक मिळवला. कु. श्रिया ऋषिकेश कदम 270 गुण मिळवून जिल्ह्यात 25 वी, कु. शर्वणी देवेंद्र पुरंदरे 270 गुण मिळवून जिल्ह्यात 27 वी, उत्कर्ष दौलत पवार 252 गुण मिळवून जिल्ह्यात 90, कु. प्राजक्ता उत्तम पवार 250 गुण मिळवून जिल्ह्यात 98 वी, ऋग्वेद राजेंद्र जंगम 246 गुण मिळवून जिल्ह्यात 121 वा. कु. प्रणिता सुजित शिंदे 242 गुण मिळवून जिल्ह्यात 142 वी आणि साईराज सुभाष जाधव 238 गुण मिळवून जिल्ह्यात 171 व्या क्रमांकाने यशस्वी झाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इ. 5 वी साठी विनायक काकडे, अमित मोरबाळे, मस्कू मोरे, जगदीश पवार, ऋतुराज घाटगे, संतोष माने, दिपक वनवे, सौ. रुपा शिंदे, सौ. हेमांगी जाधव, सौ. कुमुदिनी गुरव, सौ. मनिषा सुपे, सौ. रंजना कुंभार यांच्यासह इ. 8 वी साठी दिपक पवार, मस्कू मोरे, सौ. सुवर्णा देशपांडे, सौ. सोनाली महाडीक, सौ. रुपाली हराळे, सौ. अपर्णा जाधव, सौ. शालन जाधव, सौ. निलम शेवटे यांनी विविध विषयासाठी मार्गदर्शन केले.

इ. 8 वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत ईशान प्रविणकुमार केंजळे 248 गुण मिळवून जिल्ह्यात 48 वा, अर्थव संतोष कुलकर्णी 246 गुण मिळवून जिल्ह्यात 39, सोहम सचिन घाडगे 236 गुण मिळवून जिल्ह्यात 78 वा, कु. ईश्वरी संजयकुमार घाटगे 230 गुण मिळवून जिल्ह्यात 104 वी आणि कु. रमा सत्येन देशपांडे 230 गुण मिळवून जिल्ह्यात 104 वी आली.

या यशाबद्दल शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त अनंत जोशी, डॉ. संजीव गोखले, डॉ. मधूसुदन मुजूमदार, डॉ. शाळेचे नुतन मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापक डी. एस. कांबळे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, भारती दळवी, निलम तीरमारे, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच पालक संघाचे प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.