प्राचार्यांच्या हटवादीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

वाई येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रकार – हजेरीचे कारण देत नाकारले परीक्षेचे हॉलतिकीट

वाई – वाई एमआयडीसीत असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्राचार्यांच्या हटवादी भूमिकेमुळे संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, परीक्षेसाठी देण्यात येणारे हॉलतिकीट नाकारल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

संस्थेतील काही शिक्षक, पालक, व विद्यार्थ्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे धाव घेवून प्राचार्य एन. के. माने व फिटर निरीक्षक संपत वंजारी यांच्या बदलीची मागणी करीत एकाच गोंधळ घातला. विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार नसून त्यांचे चालू वर्ष वाया जाणार आहे. वाई तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून सर्व सामान्य कुटुंबातील मुले वाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध प्रकारच्या कोर्सचे प्रशिक्षण घेत असून त्यांची हजेरीची टक्केवारी कमी असल्याचे कारण पुढे करत संस्थेच्या प्राचार्यांनी परीक्षेस देण्यात येणारे हॉलतिकीट देण्यास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे गुरुवार, 25 पासून सुरु होणाऱ्या परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांचे वर्ष वाया जावून त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ. मकरंद पाटील यांच्याकडे धाव घेवून संस्थेचे प्राचार्य करत असलेल्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला, आमदारांनी मध्यस्थी करीत मुलांच्या समस्या समजावून घेवून यशस्वी तोडगा काढला व संस्थेच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवून घेण्यास भाग पाडले. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या दारातच आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याने संस्थेच्या प्रशासनाची एकाच तारांबळ उडाली. प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांची समन्वय बैठकीचे आयोजन करून एकमेकाशी समन्वय साधण्यास भाग पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)