कहाणी 100 दिवसांची

अंदाज, जुर्म, नो एंट्री, मस्ती, बिल्लू, मुंबई से आया मेरा दोस्त, पार्टनर, ब्लू आणि झूम बराबर झूम यांसारख्या चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांना आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने मोहीत करण्याचा प्रयत्न करणारी लारा दत्ता या अभिनेत्रीने नुकताच डिजिटल दुनियेमध्ये प्रवेश केला आहे. 

लाराचा डिजिटल डेब्यू “हंड्रेड’ या वेबसिरीजमधून झाला आहे. या वेबसीरीजमध्ये लारा सौम्या शुक्‍ला नावाची व्यक्‍तिरेखा साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये लाराच्या जोडीला “सैराट’फेम रिंकू राजगुरु ही मराठमोळी अभिनेत्रीही झळकत आहे. रिंकूने नेत्रा पाटील ही व्यक्‍तिरेखा साकारली आहे. ही एक कॉमेडी-ऍक्‍शन सीरीज आहे. 25 एप्रिल रोजी डिज्ने आणि हॉटस्टार व्हिआयपीवर त्याचा प्रीमियर प्रसारित झाला.

या मालिकेमध्ये सौम्या आणि नेत्रा या दोघी जणी एक प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी 100 दिवसांचे लक्ष्य ठेवतात. परंतु या 100 दिवसांत अशा काही घटना घडतात की त्याची कल्पनाच कुणी केलेली नसते. रुची नारायण दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये परमीत सेठी, करण वाही, रोहिणी हट्टंगडी, सुधांशू पांडे आणि मकरंद देशपांडे यांच्याही भमिका आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.