शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर

ऊर्जा, आयटी, भांडवली वस्तू क्षेत्रात तेजीत

मुंबई – अमेरिका आणि ब्रिटनमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आले. अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेअर बाजारात काही क्षेत्रात खरेदी होऊन निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.

आजची खरेदी व्यापक होती. सेन्सेक्‍ससंबंधातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 318 अंकांनी वाढून 54,843 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 16 अंकांनी वाढून 16,325 अंकांवर बंद झाला. रुपयाचे मूल्य आज 19 पैशानी वाढल्यामुळे निर्देशांकाना चांगलाच आधार मिळाला.

पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टायटन, आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.

अमेरिकेतील महागाई न वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे अमेरिकेचे पतधोरण मवाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर ब्रिटनचा विकासदर 4.8 टक्‍क्‍यावर गेला आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येते. चार दिवसापासून मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये बरीच विक्री होत होती. मात्र आज या क्षेत्रात खरेदी झाल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.