मराठा आरक्षणावरील स्थगिती म्हणजे पांडुरंगाचा आशिर्वादच

मुंबई – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट द्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ट्विटरवरुन आषाढी एकादशीच्या शुभदिनी आराध्य दैवत पांडुरंगाने दिलेला हा आशिर्वादच आहे, असे पाटील यांनी ट्विट करुन म्हटले आहे. दरम्यान पाटील यांनी ट्विट केले आहे की, ‘मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीला यानिमित्ताने पाठिंबाच मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या शुभदिनी आराध्य दैवत पांडुरंगाने दिलेला हा आशिर्वादच आहे.


दरम्यान, पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ट्विटद्वारे मराठा आरक्षणाबाबत माहितीस्तव सांगितले आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.