‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’लाही पावसाचा फटका

गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढू लागला

नवी दिल्ली – जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीलाही पावसाचा फटका बसला आहे. काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. सरदार पटेल यांच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचे पाणी आल्याने पर्यटकांना तेथे जाणे अडचणीचे ठरत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातच्या राजपीपला शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे. हे स्मारक 20 हजार मी. क्षेत्रात आहे आणि 12 किमी आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. 182 मीटर उंचीची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे.

या पुतळ्यामध्ये बसवण्यात आलेल्या लिफ्टमधून पर्यटक वर जाऊन आजूबाजूचे विहंगम दृश्‍य पाहू शकतात. तेथून त्यांना सरदार सरोवर, धरण आणि नर्मदेच्या सतरा किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावरील फुलांचे सौंदर्य पाहता येते. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.