राज्यात थंडीचा कडाका वाढला

पुणे – राज्यात थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. रविवारी बहुतांशी ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी नोंदविल्या गेले. सर्वांत कमी तापमान नाशिकमध्ये म्हणजेच 4 अंश सेल्सियस नोंदविले. पुण्यात मात्र किमान तापमानात थोडी वाढ होऊन 6.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

राज्यातील हवामानात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्‍यता असून, काही भागांत थंडीच्या लाटेबरोबरच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे गेल्या आठवड्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. त्यामुळे आता उन्हाळा सुरू होईल, अशी शक्‍यता असतानाच बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह थांबले आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्यातच बहुतांश भागात निरभ्र आकाश राहिल्याने किमान तापमानामध्ये लक्षणीय घट होऊन राज्यात थंडीचा कडाका वाढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य महाराष्ट्रात पुण्यामध्ये शनिवारी हंगामातील नीचांकी 5.1 अंश किमान तापमानाची नोंद झाली पण, रविवारी पुण्यात तापमानाचा पारा थोडा वाढला असून किमान तापमान हे 6 अंशांपर्यंत वाढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आगामी दोन दिवसांत दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे. महाबळेश्‍वरसह नगर, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आदी भागांतही पारा 5 ते 7 अंशांवर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)