वाशिम : वाशीमच्या कामरगाव प्रचार सभेत काँग्रेसचे केबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताच मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आमचे खिसे अजून गरम व्हायचे आहे. असे खळबळ उडवणारे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने आयोजित सभेत बोलताना केले आहे. मात्र जे जुने राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या लक्ष्मीचे दर्शन करून घ्या. मात्र मतदान कॉंग्रेसला करा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले.
या आगोदर आपले सरकार नव्हते. विरोधक तेव्हा सत्तेत होते त्यांच्याकडे पैसे आहेत. त्यांचे खिसे खाली कराचे तर घरी आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका असे त्या जाहीर सभेत म्हणाल्या. या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.