साध्वी यांचे हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेलं वक्तव्य संतापजनक – सुशीलकुमार शिंदे 

कोल्हापूर – साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेलं वक्तव्य न शोभणारे आणि संतापजनक असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने साधू, संत, साधवी यांना एकत्र केले आहे. त्यामुळं भारताच्या लोकसभेत राजकारण्यांऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा त्यांचा विचार दिसतोय याची माझ्या मनात भीती असल्याची टीका माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीये, ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये काल एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त भाष्य केले होते. हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हंटले होते. मी त्यांना सांगितले की, तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते त्याला आज माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे म्हणाले, प्रज्ञा सिंग यांचे आरोप हे संतापजनक आहेत. 2008 साली मी होम मिनिस्टर न्हवतो. मी 2012 पासून मी होम मिनस्टर होतो. पण ज्या पद्धतीने भाजपाकडून साधू संत साधवी सगळ्यांना एकत्रित करून भारताच्या लोकसभेत राजकारणाच्या ऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापूरला माझ्या विरुद्ध एक साधू आणि मध्यप्रदेश मध्ये साधवी आहे. साधू आणि साधवी यांचे एकत्रीकरण करून लोकसभा करण्याचा हा प्रयत्न आहे याची माझ्या मनात भीती आहे. धर्मावर आधारित जातीवर आधारित विचार या देशात चालणार नाहीत. आपली भारतीय घटना सर्वधर्माची आहे. अशा पद्धतीने राजकारण भारतात चालणार नाही. कुठलाही पोलिस ऑफिसर हा प्रोफेशनल काम करतो. मग ते करकरे असोत किंव्हा मी पोलीस असताना असो रेकॉर्ड वर जे येईल ते करतात. त्यात त्यांचा काही दोष असेल असं मला वाटत नसल्याचंही शिंदे यांनी म्हंटलय.

ते पुढे म्हणाले, करकरे यांनी अस केलं असेल असं मला वाटत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी टार्गेट करते. सरकार त्यांचेच आहे त्यावर त्यांनी अपील केलं नाही असेही यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.