राज्यात पावसाचा जोर ओसरला

पुणे – गेले काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा पावसाचा जोर आता थोडा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना सुद्धा जोर आला आहे

गेल्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक होता कोकण-गोव्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु होती.त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत होत्या.काही नद्यांना पुर आला होता.त्यामुळे जनजीवन ही विस्कळित झाले होते.काल पासून मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.जोर कमी झाला असला तरी पाऊस पुर्ण उघडलेला नाही.अघून-मघून पावसाच्या सरी कोसळत आहे.त्यातच आजपासून श्रावण सुरु झाल्याने श्रावण सरी कोसळत आहेत. उन पावसाचा खेळ सुद्धा सुरु होता.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात वायव्येला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. रविवार पर्यत हिच स्थिती राहणार आहे.त्यानंतर पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्‍यता आहे.
पुण्यात सुद्धा आज पावसाच्या अधून-मधून सरी कोसळत होता.सकाळच्या सुमारास तर काही काळ सुर्य दर्शन सुद्धा झाले होते. पावसाची संततधार नसली एखाद दुसरी सर येत होती.आगामी दोन दिवस शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या वृत्तानुसार बंगालच्या उपसागरात वायव्येला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसह शहरात पावसाचा जोर ओसरला आहे तसेच विदर्भ,मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र, 4 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि उपनगरात तुरळक पावसाची शक्‍यता आहे.

दरम्यान, 2 ऑगस्टपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात कमी तीव्रतेसह पाऊस सुरू राहील. 4 ऑगस्टपासून मात्र पावसाच्या तीव्रतेत पुन्हा एकदा वाढ होईल आणि काही ठिकाणी जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्‍यता आहे. याच काळात कोकण आणि गोव्यामध्ये पावसाची तीव्रता वाढेल. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.