राज्य सरकार खरेदी करणार 10 हजार रेमडेसीवीर इंजेक्‍शन

मुंबई – करोनावर रेमडेसीवीर हे इंजेक्‍शन प्रभावी मानले जाते. याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 10 हजार रेमडेसीवर इंजेक्‍शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली.

राजेश टोपे म्हणाले, रेमडेसीवीर हे इंजेक्‍शन मुंबईत काही रुग्णांना देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम जाणवला. मात्र, ते औषध महाग आहे. ते त्या संबंधित रुग्णांनी विकत आणले होते. मात्र, ते औषध शासनानेही खरेदी केले पाहिजे. हे औषध अँटी व्हायरल आहे. ते व्हायरसला नष्ट करण्याचे काम करते. याचा परिणाम काही गंभीर रुग्णांवर होऊ शकेल, पण ते कोणाला द्यायचे, कोणला नाही याचाही काही प्रोटोकॉल असतो. त्या तपासून निश्‍चित त्याचा उपयोग होईल. हे इंजेक्‍शन सहसा उपलब्ध नसते, असेही त्यांनी सांगितले.

सध्या हे इंजेक्‍शन आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आपण बांगलादेशमधून आपण खरेदी करणार आहे. त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या दिवसात जाणवेल. श्‍वसनाचा त्रास तसेच आणखी हृदयविकार, श्‍वसनासंबंधीचे आजार असे काही आजार आहेत. त्यांच्यासाठी हे करोना ब्रेक करण्यासाठी वापरले जाऊ शकते, अशीही माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.