पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना शहरात उघडकीस आल्या. महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार टोकाचे उदासीन आहे. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे,’ अशी टीका खासदार सुप्रीया सुळे यांनी केली.
महिलांवर होणारे अत्याचार तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. कासबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,
काॅंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी अमदार रमेश बागवे, मोहन जोशी, स्वाती पोकळे, डॉ. सुनील जगताप,
मंजिरी घाडगे, मनाली भिलारे, गणेश नलावडे, रोहन पायगुडे, राजश्री पाटील, संगीता तिवारी, अजित दरेकर, तनया साळुंखे यांच्यासह महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.