मुंबई- गायिका नेहा कक्करने रोका समारंभातील धमाकेदार व्हीडियो शेअर केला आहे. त्यात ती सासरच्या मंडळींचे आभार मानताना दिसते आहे. नेहा आणि रोहनप्रीत सिंग काहीच दिवसात विवाहबंधनात अडकणार आहेत.
तिने कुटुंबीयांचे आभार मानत इतक्या सुरेख समारंभाचं आयोजन केल्याबद्दल आपल्या आईवडिलांचेही आभार मानले. तिनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहताना नकळतच आपणही त्या समारंभाचा एक भाग असल्याची अनुभूती चाहत्यांना होत आहे.
इन्स्टाग्रामवर नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनीही पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते रोका समारंभासाठी प्रवेश करताना दिसत असून, त्याचवेळी अस्सल पंजाबी अंदाजात, ‘हडिप्पा…. पंजाब्बी… ‘ अशी आरोळी ठोकत एकच कल्ला होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ढोल वाजू लागताच नेहा आणि रोहनप्रीतही इथं ठेका धरताना दिसत आहेत.