उत्तर प्रदेश : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ही चेंगराचेंगरीची घटना तितकी मोठी नव्हती, जितकी वाढवून दाखली जात आहे असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले हेमा मालिनी?
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चेंगराचेंगरीवर सभागृहात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया होताना त्यांनी हे वक्तव्य केलं. चुकीचं बोलणं हे अखिलेश यादव यांचं काम आहे अशी टीका हेमा मालिनी यांनी केली आहे. “खोटी माहिती देणं हे अखिलेश यादव यांचं कामच आहे. आम्हीदेखील कुंभमध्ये गेलो होतो. आम्हीदेखील संगममध्ये स्नान केलं. चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली. पण ती इतकी मोठी नव्हती. ती वाढवून सांगितली जात आहे,” असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
तसेच उत्तर प्रदेश सरकार अगदी योग्यरित्या महाकुंभमेळ्याचं नियोजन करत आहे असं सांगितलं. “अत्यंत योग्य प्रकारे मेळ्याचं नियोजन करण्यात आलं असून, प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे सुरु आहे. किती लाोक येत आहेत. हे सगळं हाताळणं कठीण आहे, पण आम्ही आमचं सर्वोत्तम करत आहोत,” असेदेखील त्या म्हणाल्या आहेत. प्रधानमंत्री प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर परिस्थिती हाताबाहेर असती तर प्रधानमंत्री आले असते का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
काय घडले होते नेमके?
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यापूर्वी संगम नाक्यावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामुळे तिथे गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जण मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे महाकुंभ मेळ्याला गालबोट लागले आहे.