नवी दिल्ली – अर्थव्यवस्था सुधारत असल्याची बरेच लक्षणे दिसून येत असली तरी सप्टेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन मात्र केवळ 0.2 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर औद्योगिक उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये वीज उत्पादन आणि खान उत्पादन वाढले असूनही ऐकून औद्योगिक उत्पादन मात्र कमी पातळीवर राहिले आहे. मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढावी याकरिता प्रयत्न करण्यात येत असले तरी सप्टेंबर महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादन उणे 0.6 टक्के इतके भरले आहे. वीज आणि खान क्षेत्राची उत्पादकता मात्र अनुक्रमे 1.4 टक्के व 4.9 टक्क्यांनी वाढली आहे.
विविध क्षेत्रातील लॉक डाऊन समाप्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात औद्योगिक उत्पादनाला वेग येईल. सप्टेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची तुलना ऑगस्ट महिन्याशी करणे बरोबर होणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.