श्रीलंकेचा संघ पाकमध्ये खेळणार

संग्रहित छायाचित्र..

दुबई – श्रीलंकन क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यासंदर्भातील सुरक्षितेबाबत खात्री करण्यासाठी श्रीलंकन बार्डाने आपली टीम पाकिस्तानमध्ये पाठवावी, असे पाक बोर्डाने म्हटले आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सप्टेंबर ते ऑक्‍टोबर दरम्यान संयुक्त अरब अमीरात (युएई) मध्ये कसोटी मालिका नियोजित आहे. दोन कसोटी मालिकेतील एक सामना लाहोर किंवा कराचीमध्ये खेळण्याबाबत श्रीलंकेने क्रिकेट बोर्डाने सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड दोन्ही कसोटी सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

2009 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्‌यात श्रीलंका संघातील माजी खेळाडू महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि अन्य सहा खेळाडूंना किरकोळ दुखापतही झाली होती. या घटनेनंतर पाकिस्तानच्या क्रिकेटला चांगलाच फटका बसला. आयसीसीशी संलग्नित देशांनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)