श्रीलंकेतले बॉम्बस्फोट हे न्यूझीलंडच्या मशिदींवरील हल्ल्याचा सूड म्हणून

कोलंबो – न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती प्राथमिक चौकशीदरम्यान पुढे आली आहे. श्रीलंकेच्या उपसंरक्षणमंत्र्यांकडून संसदेत ही माहिती देण्यात आली. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी या बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ही समितीन दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. मात्र, प्राथमिक चौकशीदरम्यान या बॉम्बस्फोटांमागील धागेदोर हाती लागायला सुरुवात झाली आहे.
या प्राथमिक चौकशीनुसार, या बॉम्बस्फोटांचा संबंध न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे झालेल्या घटनेशी असण्याची शक्‍यता आहे. 15 मार्च रोजी ब्रेन्टन टॅरेंट या हल्लेखोराने ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर हल्ला करून बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला होता. स्थलांतरित मुसलमानांना हकलण्यासाठी आणि युरोपच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा हल्ला केल्याचे ब्रेन्टन टॅरेंटने सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.