‘या’ देशात करोनाचा फैलाव ‘न्यूक्लियर रिएक्टर’प्रमाणे; मृतदेह दफन करायलाही मिळेना जागा

ब्राझिल – जगभरात करोना संसर्गाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. काही देशांमध्ये दुसरी तर काही ठिकाणी करोनाची तिसरी लाट धुमाकूळ घालत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेत करोनामुळं सर्वाधिक मृत्यू झाले आहे. त्यानंतर आता अमेरिकेसारखीच स्थिती ब्राझीलमध्ये निर्माण झाली आहे.

ब्राझीलमध्ये मंगळवारी 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 4,195 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत ब्राझीलमध्ये 3,37,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये करोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाले आहे.

ब्राझिलमध्ये रुग्णवाढीचा वेग वाढला असून मंगळवारी देशात करोनाचे 86,979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर वेळीच उपाययोजना केली नाही तर या महिन्यात ब्राझिलमध्ये 1 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्राझिलमध्ये करोना रुग्ण एका न्यूक्लियर रिएक्टरप्रमाणे वाढत आहे. आता चैन रिएक्शनची सुरुवात झाली असून हे नियंत्रणाबाहेर गेलं आहे. ही परिस्थिती फुकुशिमाप्रमाणे आहे. अणुबॉम्ब टाकल्यानंतर फुकुशिमामध्ये अशी परिस्थिती झाली होती. देशात मृतांना दफन करण्यासाठी जागा मिळणं कठीण झाल्याचं अमेरिकेच्या ड्यूक यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि ब्राझिलियन डॉक्टर मिगुएल निकोलिस यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.