जेनेव्हा – जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने केलेल्या अभ्यासात करोना विषाणू पसरण्यासाठी ऑस्ट्रेलियन बीफ कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पीटर बेन एम्बारेक यांनी कोरोनाचा प्रसार कशामुळे झाला यावर अजून संशोधनाची गरज असल्याचे म्हटले आहे.
डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचे पहिले प्रकरण चीनच्या वुहानमध्ये समोर आले होते. त्यानंतर वुहान इनस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी या संस्थेने मोठ्या स्तरावर नमुने एकत्र केले होते. त्यानंतर करोना विषाणू चीनमध्ये पसरल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, चीनने ते आरोप फेटाळले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या टीम मध्ये 10 देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू ऑस्ट्रेलियन बीफमधून प्रसारित झाल्याचे म्हटल्यानंतर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओंनी टीका केली आहे. पोम्पिओंनी जागतिक आरोग्य संघटनेचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये राजकारण सुरु झाल्याचा आरोप केला.
यामुळेच अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली असे ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिवांनी चीनच्या राष्ट्रपतींसमोर लोटांगण घातले असल्याचा आरोपही त्यांनी केला.