वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांचा फैलाव

-कराडात दवाखाने हाऊसफुल्ल; लहान मुलांसह वयोवृद्धांची संख्या लक्षणीय
-स्वाईन फ्लू, खोकला, सर्दी, डोळे येणे यासारखे साथीचे आजार
-कमी वेळात जास्तीत-जास्त लोकांना संसर्ग
-हवा, पाणी, शिंका, खोकणे आदीमधून फैलाव

कराड – पहाटे धुके, दुपारी कडक ऊन, आणि अचानक पडणारा पाऊस असा वातावरणातील बदल गेल्या चार दिवसापासून सुरू आहे. या अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्‍यात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. लोकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे आजार या वातावरणातील वायरल इन्फेक्‍शनमुळे जडू लागले आहेत. या आजारामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली असून रुग्णांमुळे दवाखाने, मेडिकल स्टोअर्स येथे आता गर्दी होऊ लागली आहे.

यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसात पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस अचानक गायब झाला. गेली चार-पाच दिवसापासून तुरळक प्रमाणात पाऊस पडू लागला आहे. कधी पाऊस, कधी कडक ऊन तर रात्री थंडी असे वातावरण तयार झाले आहे. अचानकपणे अशा एकाच दिवशी होऊ लागलेल्या वातावरणातील बदलामुळे वायरल इन्फेक्‍शन होऊ लागले आहे. या वातावरणामुळे लोकांच्या शरीरावर थेट परिणाम होत आहे.

लोकांना साथीचे रोग उद्‌भवू लागले आहेत. वातावरणातील या बदलांमुळे ताप, थंडी, सर्दी, अंगदुखी यासारखे शारीरिक आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध या वातावरणातील बदलामुळे आजारी पडत आहेत. वातावरणातील बदलाचा सामना करण्याची ताकद नसल्याने इतरांच्या तुलनेत यांना वायरल इन्फेक्‍शनचा जास्त त्रास होतो.त्यामुळे यांची संख्या देखील वाढली आहे.

मेडिकल शॉप, दवाखान्यात गर्दी
साथीच्या रोगांमुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे हलकेफुलके आजार तालुक्‍यातील रुग्णांना जडले आहेत. हे आजार बळावू नयेत, यासाठी रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच मेडिकल स्टोअर ही हाऊसफुल्ल झाले आहेत.

तालुक्‍यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव
कराड तालुक्‍यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे त्या-त्या गावातील ग्रामपंचायती व नगरपालिकेच्या वतीने प्रत्येक गावात औषधांच्या फवारणी नियमित करणे गरजेचे बनले आहे. तसेच पिण्याच्या पाण्यात टाकण्याच्या मेडिक्‍लोरच्या बाटल्यांचे संबंधित संस्थांकडून वाटप होणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)