वुहान मार्केटमुळेच “करोना’चा फैलाव

जागतिक आरोग्य संघटनेने केले मान्य

पेइचिंग – करोना व्हायरसच्या मुद्यावरून संपूर्ण जग चीनवर आरोप करत आहे, की चीनने या व्हायरसचा फैलाव वेळेत रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि जगालाही या व्हायरसच्या धोक्‍यापासून अंधारात ठेवले. जागतिक आरोग्य संघटनेवरही (डब्ल्यूएचओ) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात “डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे, की चीनमधील “वुहान मार्केट’च कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्‍यकता असल्याचेही म्हटले आहे.

“डब्ल्यूएचओ’चे फूड सेफ्टी झुनॉटिक व्हायरस एक्‍सपर्ट डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी म्हटले आहे, की कोरोना व्हायरसच्या प्रसारात वुहान मार्केटची भूमिका असल्याचे स्पष्ट आहे. नेमकी भूमिका काय हे आम्हाला माहित नाही. हाच व्हायरसचा स्रोत आहे की, येथून तो परसला, की योगायोगाने काही रुग्ण मार्केटमध्ये आणि जवळपास सापडले. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनने जानेवारी महिन्यात वुहान मार्केट बंद केले होते.

पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्‍टेड दुकानदार की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाजया आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. या तपासासंदर्भात बोलयचेच तर, चीनकडे तपासाची सर्व साधने आणि योग्य प्रकारचे संशोधकही आहेत. जगातील वेट मार्केट्‌समध्ये नियमांचे पालन करणे, तेथे स्वच्छता ठेवणे आणि काही मार्केट बंद करण्याचीही आवश्‍यकता आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात चीनला आपले हात झटकता येणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.