लहान गावांतही कोरोनाचा प्रसार

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशातील लहान शहरे, गावांत पसरू लागली आहे. ही शहरे पहिल्या लाटेत संसर्गापासून दूर होती. वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील समस्या मोठी आहे. अडचणीही मोठ्या आहेत. त्यामुळे लोकांना चांगल्या उपचारासाठी नातेवाइकांना घेऊन शहरांच्या दिशेने धाव घेतल्याविना पर्याय उरलेला नाही.

गेल्या 24 तासांत जयपूरच्या खासगी रुग्णालयांत ऑक्‍सिजनचा तुटवड्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ऑक्‍सिजनसाठी लोक भटकत आहेत. दिल्लीच्या सराय काले खां स्मशान घाटावर अंत्यसंस्कारासाठी आणखी व्यवस्था केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारमध्ये एका व्यक्तीकडून सरासरी तीन लोक बाधित होत आहेत.

छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात मार्चपर्यंत अनेक गावांत सक्रिय रुग्ण नव्हते. परंतु गेल्या 1 आठवड्यात येथील रुग्णसंख्या 3 हजारांवर गेली. रुग्णालयांत 7 व्हेंटिलेटर आहेत, परंतु त्याला चालवणारे तज्ञ नाहीत. रुग्णालयात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञांचाही अभाव आहे. त्यामुळे लोकांना योग्य उपचार मिळत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.