गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्याच्या डागडूजीची निविदा निघाली
नगर – शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापुर्वीच रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित असतांनाही ती झाली नाही. पावसाळ्यात तर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाला मुहूर्त लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शहरातील बऱ्याच रस्त्यात फेज -2च्या कामासाठी खोदण्यात आले
मात्र काम झाल्यानंतर खड्डे बुजविण्या पलीकडे काही केले नाही. वास्तविक पाहता खड्डे बुजविल्यानंतर त्यावर डांबरीकरण होणे गरजेचे होते मात्र त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने बुजविलेल्या खड्ड्यांतील माती दबून त्याठिकाणी आणखीन खोल खड्डे निर्माण झाले. तर ज्या ठिकाणी थोडीफार डागडुजी केली होती तेथील डांबर आणि बारीक खडी वाहून गेली आणि मोठी खडी उघडी पडली. यात प्रामुख्याने सखल भागाचा समावेश आहे.तर अन्य ठिकाणी डागडुजीच्या पत्ताच नसल्याने तेथे खड्डे खोल होत गेले.
त्यात पटवर्धन चौक, गुजरगल्लीतील शनी चौक, माणिक चौक, घुमरे गल्ली आझाद चौकाचा समावेश आहे. ह ाभाग प्रामुख्याने गणपती देखावे पहायला जाणाऱ्या नागरिकांकडून पायी चालंण्यासाठी वापरला जणारा रस्ता असून त्याची डगडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे. या डागडुजीच्या कामाची निविदा निघाली असून आज उद्या कार्यारंभ आदेश संबंधीत ठेकेदारांना देण्यात येणार आहेत त्या नंतर लगेचच म्हणजे सोमवार पर्यंत या कामास प्रारंभ केला जाईल असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.