स्पाईन रोड बाधितांच्या सोडतीसाठी मुहूर्त सापडला

पिंपरी – तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुर्नवसनाला अखेर मुहूर्त लागला आहे. 126 रहिवाशांपैकी उर्वरीत 46 लाभार्थींसाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी सोडत काढण्यात आली.

तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्त्याने बाधितांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 11 मधील पर्यायी निवासी जागा मंजूर झाली आहे. 75 मीटर स्पाईन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 52 मीटर ते 60 मीटर रस्ता बाधितांच्या पुनर्वसनासाठी नगररचना विभागामार्फत 126 जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 77 लाभार्थ्यांची सोडत 27 ऑगस्ट 2018 रोजी काढण्यात आली होती.

उर्वरित 46 लाभार्थ्यांची सोडत अखेर आज मार्गी लागली. कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात अतिरिक्‍त आयुक्‍त अजित पवार व “फ’ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागामार्फत लाभार्थ्यांना भूखंडाबाबत माहिती देत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)