नगर बाह्यवळण रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला वेग 

विळद घाट ते नेप्ती कांदा मार्केट हा 15 किमी रस्ता जूनपर्यंत होणार पूर्ण

नगर – नगर बाह्यवळण अंतर्गत असलेल्या विळदघाट पायथा ते नेप्ती कांदा मार्केट या 15 किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम वेगाने सुुरू असल्याने नगर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा ताण जून अखेर संपलेला असेल. त्यामुळे नगर शहरातून होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. नगर बाह्यवळण रस्त्यांबाबत दैनिक प्रभातने वेळोवेळी बातम्याच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे. नगर बाह्यवळण अंतर्गत येणाऱ्या विळद घात ते नेप्ती कांदा मार्केट रस्त्यासाठी 15 कोटीच्या आसपास 15 किलोमीटर लांबीच्या व 7 मीटर रुंदीच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे.

कोणत्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मोहिते जी.ए., कार्यकारी अभियंता चव्हाण ए.बी., उपअभियंता एम.एच. कसबे, शाखा अभियंता आर.ए. ढोबळे, डी.एम.बांगर व ठेकेदार आर.आर.कपूर यांनी घेतला आहे. नगर बाह्यवळण रस्त्याची आवस्था अतिशय वाईट झाल्यामुळे अवजड वाहने नगर बाह्य रस्त्याने न जाता नगर शहरातून वाहतूक सुरु होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामधून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामधून अनेक अपघात होत होते. शहर वाहतूक पोलिसांची मोठी कसरत होत होती.

याबाबत गेल्या दोन वर्षामध्ये या रस्त्याबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन विळदघाट पायथ्या ते नेप्ती कांदा मार्केट या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम वेगाने सुरु असल्यामुळे जून अखेर अखेर हा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधक विभागाने आखलेले आहे. मध्यंतरी ठेकेदाराच्या डांबराच्या अडचणीमुळे कामात काही प्रमाणात अडथळे निर्माण झाल्यामुळे कामास विलंब झाला होता. तोही प्रश्‍न मार्गी लागलेला असल्याने रस्याचे काम वेगाने सुरु झालेले आहे. रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी शाखा अभियंता आर. ए. ढोबळे, डी. एम. बांगर, उपविभागीय अभियंता एम. एच. कसबे उन्हाची पर्वा न करता जातीने स्वतः उभे राहून कामे करून घेत आहेत.

विळद घाट ते पुणे चौक रस्त्यांचे काम दर्जेदार करण्यात आलेले आहे. यासाठी आय. आय. टी मुंबई पवई यांचे डिझाईन घेण्यात आलेले आहे. काम जवळपास पूर्ण झालेले असून वाहतूक पूर्णपणे चालू झालेली आहे. पुणे रोड ते सोलापूर बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे बुजविणे व मजबुती करण्याचे कामे चालू आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रयत वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

एम. एच. कसबे उपविभागीय अभियंता सां. बा. अहमदनगर

बाह्यवळण रस्त्यांचे काम मानकाप्रमाणे चालू असून रस्ता दर्जेदार करण्याचा मानस आहे. अधीक्षक अभियंता मोहिते, कार्यकारी अभियंता चव्हाण, उपविभागीय अधीक्षक एम. एच. कसबे यांनी कामात प्रत्यक्ष लक्ष घातल्यामुळे व काही अडचणी सोडविल्यामुळे रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे.

आर.ए.ढोबळे शाखा अभियंता, सां. बा. अ.नगर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.