जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका संघ भारतात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल होत आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला असून त्यात अनरीच नोर्जे व वेन पार्नेल या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी संघात पुनरागमन केले आहे. येत्या 9 ते 19 जून या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ ः टेम्बा बवुमा (कर्णधार), क्वांटन डीकॉक, रीज़ा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हीड मिलर, लुंगी एन्जीडी, अनरिच नोर्जे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, मार्को जेन्सन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॉसी वॅन दर दुसेन.