पुणे – बुलेटचा आवाज वाढवल्याने तसेच भाई न म्हटल्याने दोन महिलांसाह तीघांना मारहाण करण्यात आली. ही घटना हडपसर येथील साडेसतरा नळी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आनंदा काळे (25,रा.साडेसतरा नळी, हडपसर) हा त्याची बुलेट घेऊन घरा जवळून चालला होता. यावेळी त्याने बुलेटची रेस वाढवल्याने मोठा आवाज झाला. तेव्हा आरोपीपैंकी एकाने आवाज कोणाला काढला रे असा जाब विचारला.
यावर आनंदाने ऐ सोन्या तुला नाही असा म्हणाला. याचा राग येऊन त्यातील एकाने मला सोन्या नाही म्हणालयचे मी इथला भाई आहे. मला भाई म्हणत जात असे म्हणत हल्ला चढवला.
आनंदाला आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. तसेच त्याच्या सासू व पत्नीसही हाताने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.बी.जाधव तपास करत आहेत.