पुणे – वेबसिरीज पाहत असताना लॅपटॉपच्या स्पीकरचा आवाज कमी न केल्याने तरूणावर वार केल्याचा प्रकार बुधवारी रात्री फुरसुंगी येथे घडला.
याप्रकरणी ऍड. जावेद शेख (रा. ओम साई पीजी सिध्दी कॉम्प्लेक्स, भेकराईमाता मंदिराशेजारी, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अक्षय त्रिभुवन यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेपूर्वी दोघांत बाचाबाची झाली होती.