Aaditya Thackeray Post For Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून टीका करणे भोवलं आहे. कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इतकेच काय तर, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.
“विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने तोडला. जे गाणं १००% खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. Aaditya Thackeray Post For Kunal Kamra |
Mindhe’s coward gang breaks the comedy show stage where comedian @kunalkamra88 put out a song on eknath mindhe which was 100% true.
Only an insecure coward would react to a song by someone.
Btw law and order in the state?
Another attempt to undermine the CM and Home Minister…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 23, 2025
दरम्यान, कुणाल कामरा रविवारी रात्रीच मुंबई सोडून पाँडिचेरीला रवाना झाला असल्याचे म्हंटले जात आहे. सध्या तो कुठे आहे याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे त्याने आपली सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईतून पलायन केल्याचं सांगितलं जातं. पोलीसांकडूनही कुणाल कामराचा शोध घेतला जात आहे. Aaditya Thackeray Post For Kunal Kamra |
तर दुसरीकडे, कुणाल कामराच्या गाण्यामुळे निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. त्याच्याविरोधात राजकीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चिघळत आहे.
हेही वाचा:
पुणे-सातारा डेमो बंद पडण्याचा प्रकार; सुप्रिया सुळे व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या….