खडकी – राष्ट्रपतिपदक विजेत्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने “एमपीएससी’मध्ये असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाऊंट सर्व्हिस या उच्चपदावर झेप घेत यश संपादन केले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने हे यश संपादन केल्याने सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पोलीस दलामध्ये एटीएस विभागात काम करणारे प्रदीप ऊर्फ बापू जांभळे यांचा मुलगा प्रतीक जांभळे याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. बापू जांभळे हे एटीएसमध्ये कार्यरत असून त्यांना महासंचालक पद तसेच राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे.
प्रतीक याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून एमपीसीच्या थेट फर्स्ट क्लास पदावर झेप घेतली आहे. विवेक कुलकर्णी तसेच धर्माधिकारी सर, ज्ञान प्रबोधिनीमधील सर्व शिक्षक, मित्र तसेच आपली आई वर्षा, वडील, भाऊ तसेच जीवनसंगिनी यांचे प्रतीकने आपल्या यशामध्ये श्रेय असल्याचे सांगितले.