टेंभुर्णी -वडिलांच्या सतत घालून पाडून बोलण्याच्या त्रासाला कंटाळून मुलानेच दोन साथीदारांच्या मदतीने निर्घृण खून केला. या प्रकरणी मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे. संजय मारुती काळे (वय 55, रा. शिराळ, ता. माढा)असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
आकाश संजय काळे (वय 20, रा.शिराळ) लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (वय 27) व अल्लाउद्दीन उर्फ आलम बासू मुलाणी (वय 33, दोघे रा. सुर्ली, ता. माढा) अशी पोलीस कोठडी ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.